गावाची ग्रामपंचायत
कडावल हे महाराष्ट्रातील सिंधदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील एक उपक्रमशील, कृषीसंपन्न व सामाजिकदृष्ट्या सजग गाव आहे. कडावल हे गाव तालुका मुख्यालय कुडाळ (तहसिलदार कार्यालय) पासून सुमारे २० किमी आणि जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्गपासून सुमारे १८ किमी अंतरावर स्थित आहे. या गावामध्ये ८ वाड्या आहेत. गावची लोकसंख्या १४०५ इतकी आहे. गावातील लोक गणेश चतुर्थी, दसरा, दिवाळी ,होळी यासारखे उत्सव एकोप्याने साजरे करतात. गावामध्ये तीन प्राथमिक शाळा आहेत. गावात एक सुसज्ज अशी ग्रामपंचायत आहे त्यामध्ये ग्रामसेवक व ४ कर्मचारी आहेत.






