
कडावल ग्रामपंचायतमध्ये आपले स्वागत आहे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्याचा सांस्कृतिक आणि सामाजिक केंद्र
ग्रामीण विकासाची ओळख कडावल
महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील एक निसर्गरम्य कडावल गाव. आपले गाव म्हणजे शांतता, सौंदर्य आणि समाधान यांचे सुंदर मिश्रण आहे. गावात सर्वत्र हिरवीगार झाडे, डोलणारी शेती, स्वच्छ हवा आणि पक्ष्यांचा मधुर किलबिलाट अनुभवायला मिळतो. सकाळच्या वेळी धुक्याची हलकी चादर आणि संध्याकाळी मावळणारा सूर्य हे दृश्य मनप्रसन्न करून टाकते.गावातील लोक साधे, प्रेमळ आणि एकमेकांना मदत करणारे आहेत. सण-उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. शेती हा मुख्य व्यवसाय आहे. तसेच बाजारपेठ आहे.दर शुक्रवारी आठवडे बाजार भरवला जातो.निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्यामुळे मन शांत आणि निरोगी राहते. म्हणूनच आपण सर्वांनी आपल्या गावाची स्वच्छता राखली पाहिजे, झाडे लावली पाहिजेत आणि पर्यावरणाचे संरक्षण केले पाहिजे.


पदाधिकारी आणि कर्मचारी
प्रशासक
श्री.संजयकुमार ओरोसकर


ग्रामपंचायत अधिकारी
श्री. महादेव मु.वालावलकर


माझी सैनिकाचा सत्कार


वृक्षारोपण कार्यक्रम


प्लास्टिक मुक्त गाव मोहीम


एक पेड माँ के नाम मोहिम









